Lekh


ग्रंथालयांनी वाचकांपर्यंत जावे
डी. व्ही. कुलकर्णी
अध्यक्ष
महाराष्ट्र सेवा संघ हिती व तंत्रज्ञान मोठय़ा प्रमाणावर विकसित होत असताना, बदलत्या काळानुसार आता ग्रंथालयांनीही बदलले पाहिजे. नव्या जगात जशी नवी आव्हाने आहेत, तशीच नवी क्षितिजेदेखिल आहेत. प्रतिकुल स्थितीत व आव्हानांना सर्मथपणे तोंड देत महाराष्ट््ररातील ज्या ग्रंथालयांनी शंभर वर्षे पूर्ण केली आहेत, त्या 'शतायू' ग्रंथालयांचे संमेलन भरविण्याचा उपक्रम यंदा अमृत महोत्सवात पदार्पण करणार्‍या मुंबईतील मुलूंड येथील 'महाराष्ट्र सेवा संघाने'चा आहे. येत्या २८ एप्रिल रोजी हे संमेलन मुलूंड येथे होत आहे. ग्रंथालये आहेत पण अधिक वाचकप्रिय कशी होतील. वाचकसंख्या कशी वाढेल आणि ग्रंथालय चळवळीच्या वाढीसाठी कार्यकर्ते कसे मिळतील या कळीच्या मुद्यांवर या संमेलनातून चर्चा होणार आहे. महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष डी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी आजच्या 'जागातिक पुस्तक दिना'निमित्त केलेली ही बातचीत..
संमेलन घेण्यामागे प्रेरणा काय आहे.?
केवळ वाचक. वाचक ग्रंथालयात येत नसतील तर ग्रंथालयांनी आता त्यांच्यापर्यंत जायला हवे, हे जाणण्याचा प्रयत्न आहे. त्याचे साधक बाधक परिणाम तपासण्याची भूमिका आहे. मूकपणे काम करणार्‍या ग्रंथप्रेमींची दखल घेणारे कदाचित हे पहिलेच संमेलन असेल. महाराष्ट्रात 'शतायू' ग्रंथालयांचा शोध घेतला तेव्हा ८३ आढळली. अजूनही शोध सुरूच आहे. एकट्या कोल्हापुरात दहा होती. पुणे, अहमदनगर, वाई, नाशिक, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, अकोला याठिकाणी ग्रंथालयांची चळवळ आहे. त्यातील शतायूंचा शोध सुरूच आहे. १८२८ साली पहिले ग्रंथालय रत्नागिरीत स्थापन केले गेले.
संकल्पना काय आहे?
काळ बदलतो आहे, तसे ग्रंथालयांनी बदलले पाहिजे. ई-बूक, इंटरनेट, दृकश्राव्य माध्यमांची रेलचेल हवी. वाचकसंख्या कमी झाली, कमी होत आहे असे सांगून उपयोगाचे नाही. साक्षरता वाढत आहे, म्हणजे लोक वाचत आहेत. पुस्तकांवर बार कोडिंग आले. वेळ वाचला. ग्रंथालयाचे संगणकीकरण व्हायला हवे, वाचायला मोकळी जागा, वाचकाला फिरायला सर्वत्र मोकळीक, चांगल्या सीड्ीज, उत्तमोत्तम सर्व प्रकारची पुस्तके, टीव्हा रूम, वाचक संवाद दृढ करणारे भरपूर उपक्रम असले पाहिजेत.
संमेलनातून काय मिळेल?
वाचक अभिरूचीचे, त्यांच्या सवयींचे किंवा त्यांच्यात आलेल्या नव्या वाचनप्रियतेचे जे बदल होत आहे, त्याची चर्चा प्रामुख्याने होईल. एरवी प्रत्येक ग्रंथालय आपापले उपक्रम राबवत असतोच. त्यातून त्यांना वाचक भेटत असतात. त्या उपक्रमांची देवाणघेवाण होईल. तीन चर्चासत्र आहेत. ग्रंथालयांच्या व्यथा आणि कथा, माध्यमं आणि ग्रंथव्यवहार, संगणक आणि ग्रंथव्यवहार यामधून ग्रंथालय चळवळीचा उहापोह होईल. नवे निश्‍चितच गवसेल.
ग्रंथालय कर्मचार्‍यांविषयी चर्चा होईल?
निश्‍चितच. त्यांचे प्रश्न जिवंत आहेत. ग्रंथालयाचे उत्पन्न फार नसल्याने त्यांचे वेतन फारच कमी असते. त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी साइड बिजनेस करता येईल का, उत्पन्न वाढीचे कोणते स्त्रोत असू शकतात, चर्चेत वेळ न घालवता तात्काळ कोणते उपक्रम सुरू शकतात यावर निश्‍चितच भर आहे.
ग्रंथालयांना कोणते प्रश्न भेडसावत आहेत?
ग्रंथालय चळवळ समजून काम करणारे निस्पृह कार्यकर्ते मिळत नाहीत. पूर्वी कर्मचारी वेगळे व कार्यकर्ते वेगळे असायचे. दुसरे भेडसावणारे प्रश्न म्हणजे पुस्तकांच्या वाढत्या किंमती, पुस्तक वितरणातील गैरसोयी, इंग्रजी पुस्तकांची वाढलेली मागणी. प्रसंगी ती मराठी पुस्तकांसाठी घातक म्हणावी का, असा प्रश्न कधी कधी पडतो. इंग्रजी पुस्तकांच्या किंमती फार आहेत. शिवाय चांगली कोठली, हे तपासायचे कसे. ग्रंथालयांना सरकार आर्थिक मदत करते, पुरस्कार व प्रोत्साहनही देते, दर्जानुसार ग्रंथालयांचे वर्गीकरणही बरोबर होते. पण प्रत्यक्षात ग्रंथालयांची मिळकत फार नसल्याने आर्थिक पेच निर्माण होतातच. ते ग्रंथालये सोडवतात. तरीही ही सेवा नाउमेद सुरू आहे.
आणखी काय केले पाहिजे?
ेुप्रत्येक शहरातील सर्व वाचनालये, ग्रंथालये संगणकीय लॅनव्दारे एकमेकांना जोडली जायला हवीत. त्यामुळे वाचक आणखी रूळावेल. वाचकाला हवे असलेले पुस्तक किंवा अन्य साहित्य आपल्या ग्रंथालयात नाही, ते अमुक ग्रंथालयात उपलब्ध आहे, हे बटन दाबताच माहीत होईल. त्यामुळे संवाद वाढेल, आदानप्रदान वाढेल.वाचक आणि ग्रंथालय यांच्यातील दरी कमी होईल. ग्रंथालय ही गरज आहे हे सांगण्याची वेळच येणार न् (शब्दांकन : रघुनाथ पांडे)

No comments:

Post a Comment